कठोर दिसतो बाप वरतूनी
प्रेम करी तो हृदयातूनी
नसती जवळी पैसा जरी
मुलांचे तो लाड पुरवी
झिजल्या त्याच्या चपला जरी
मुलांसाठी तो कष्ट करी
रात्री अंग पडता जमिनीवरी
उद्याची चिंता त्याला पडी
आई चे ते प्रेम दिसते
बापाचे प्रेम झाकूनी जाते
कठोर दिसत असला जरी
प्रेम करीत असतो मुलांवरी
बाप गेल्यावर महती कळते
मात्र वेळ निघून गेलेली असते
जिवंतपणी त्याला वेळ द्या
तुम्हीच आहात माझे असे एकदा
तरी म्हणत जा
सौ.वंदना ग. सुरंगलीकर