काव्य रसिक

गुरुवार, २९ एप्रिल, २०२१

जागे व्हा

 

हे क्रांतिकारकांनो प्राण दिले तुम्ही स्वातंत्र्यासाठी

तुमच्या प्राणांची किंमत जाणली नाही आम्ही स्वार्थासाठी

तुम्ही लढले आपल्या प्राणप्रिय देशासाठी

आम्ही लढतो केवळ स्वतःच्या नावासाठी

तुमच्या मुळेच आज स्वातंत्र्य मिळाले

पण हे स्वातंत्र्य कसे राखायचे अजूनही नाही कळले

तुम्ही आपल्या देशाचा अभिमान बाळगला

आम्ही आमच्या संपत्तीचा अभिमान बाळगतो

तुमच्या सारखे देशासाठी लढण्याची अजूनही वेळ गेली नाही

देशाची शान राखण्याची संधी अजूनही गेलेली नाही 

हे तरूणांनो उठा,जागे व्हा

देशासाठी लढायला तयार व्हा

गुरुवार, २२ एप्रिल, २०२१

स्त्री चे दु:ख

 

स्त्री जन्माकडे पाहून रडायला येते

या जगात ती कधी येते,कधी जाते ठाऊक नसते

आधुनिक विचारांची असली तरी जग रडायला लावते

तरीही जगापुढे सदा हसत रहाते

मनातले दु:ख मनातच ठेवते

म्हणून तुला सांगावेसे वाटते

अभिमान बाळग स्त्री जन्माचा नेहमी

कारण ही दुनिया वसली तुझ्या मुळेच जननी

गुरुवार, १५ एप्रिल, २०२१

मानवी मन

विधात्याने निर्माण केलेले मानव

कुणी देव तर कुणी दानव

कुणाचे मन आभाळाएवढे

तर कुणाचे मोहरीच्या दाण्याएवढे

कुणी मदतीला धावणार

तर कुणी पाय ओढणार

कुणी दुसऱ्या च्या सुखात आनंद मानणारे

तर कुणी दुसऱ्यांना दु:ख देणारे

कुणी भांडण सोडवणार

तर कुणी आगीत तेल ओतणार

अजब ही मानवी मनाची दुनिया

हीच तर विधात्याची किमया


गुरुवार, ८ एप्रिल, २०२१

जगणं

 या जगात कुणीही कुणाचं नसतं

जगण्यासाठी नावापुरता नातं असतं

जन्माला येतांना एकट्यालाच यावं लागतं

मेल्यानंतर पण एकट्यालाच जावं लागतं

तरीही जगण्यासाठी माणूस नात्यांचं जाळ विणतो

मरेपर्यंत त्यातच गुरफटत जातो

माझे माझे करत रक्तातल्या नात्याशी भांडत रहातो

स्वतः च्या स्वार्थासाठी चांगुलपणाचे पांघरूण ओढत असतो

माहीत असते येत नाही काही आपल्या बरोबर

फक्त तीन-साडेतीन हात जमिन असते आपली खरोखर.....

अभिवादन विर सावरकरांना

  वी रास मुजरा जन्म भगुर गावी ज्या विनायकाचा झाला, बाल वयातच त्याने लढा स्वातंत्र्याचा आरंभला, काव्य,लेख,पुस्तके लिहून, देशाप्रती अभिमान जाग...