काव्य रसिक

मंगळवार, ३१ मे, २०२२

अभिवादन विर सावरकरांना

 वीरास मुजरा

जन्म भगुर गावी ज्या विनायकाचा

झाला,

बाल वयातच त्याने

लढा स्वातंत्र्याचा आरंभला,


काव्य,लेख,पुस्तके लिहून,

देशाप्रती अभिमान जागवला,

मरेपर्यंत देशासाठी लढेन

हा बाणा अंगीकारला,


तुजसाठी मरण ते जनन

तुजवीण जनन ते मरण

असे म्हणत देशकार्य

त्यांनी केले

अश्या या विराचे स्वागत इंग्रजांनी

जन्मठेप देऊन केले.


जरी अंदमानात काळया पाण्याची

शिक्षा केली तोवर तुमचे राज्य टिकेल का? 

अशी विचारणा त्याने साहेबास केली


जरी उपहास या मृत्युंजयाचा

तत्कालीन नेत्यांनी केला

परी सदैव हर भारतीयाने

मुजरा त्या वीरास केला


स्थान तयाचे अबाधित सदैव राहणार

स्वप्न त्याचे अखंड भारताचे

एक दिन साकार भारतीय करणार.

संकल्पना :- सौ.वंदना ग.सुरंगलिकर

शब्दांकन :- विनय विजय वरणगांवकर


शुक्रवार, १३ मे, २०२२

पितृऋण

 कठोर दिसतो बाप वरूनी

हृदय त्याचे कोमल असे

चेहऱ्यावरी चिंता साऱ्या

ओठावरी हास्य असे

आयुष्यभर कष्ट करी

ठिगळाचे तो कपडे वापरी

झिजल्या चपला त्याच्या

पायाला त्या चटके बसती 

खाऊ आणण्या मुलांसाठी 

धडपड त्याची सदा असती 

व्हावे मुलांचे कल्याण 

हीच आशा असे मनी

स्वप्न त्याचे पूर्ण करुनी 

पितृऋण फेडूनी त्याचे

 व्हावे मुलांनी उतराई













रविवार, ८ मे, २०२२

आठवण

 तू जवळी असता माते

उणीव ना भासे कशाची

हट्ट करुनी तुझ्याकडे

स्वप्न माझे मी पूर्ण करी

तुझी इच्छा कधी ना विचारी

काय हवे तुला ,

आवड तुझी काय

याची मला कधी ना चिंता

माझ्याच विश्वात रमले मी

कळली ना तुझ्या मनीची व्यथा

आज मात्र उणीव तुझी भासे

तुझी आवड पूर्ण करण्या

तगमग ही जीवा लागे

कुठे शोधू तुला,

हा प्रश्न मनी पडे

फोटो पुढे उभे राहुनी

नयनातून हे अश्रू गळे






शुक्रवार, ६ मे, २०२२

पैसा

 या जगात पैश्याला आहे महत्व

पैसा जवळ आल्यावरच माणसाला येते महत्व

पैश्यासाठी एकमेकांचे जीव घेतात

पैश्या पाई आईबापाला विसरतात

पैश्यामुळे माणसाने माणूसपण हरवले

पैश्यानेच हेवेदावे शिकवले

पैसा जमा करण्यातच संपते जीवन

पैसा पैसा करतच येते मरण.






अभिवादन विर सावरकरांना

  वी रास मुजरा जन्म भगुर गावी ज्या विनायकाचा झाला, बाल वयातच त्याने लढा स्वातंत्र्याचा आरंभला, काव्य,लेख,पुस्तके लिहून, देशाप्रती अभिमान जाग...