काव्य रसिक

मंगळवार, ६ जुलै, २०२१

देवास पडलेला प्रश्न

 


माणसाचा जन्म देऊनी
केले उपकार माझ्यावर
तुला वाटले देवा
करीन हा जगाचा उद्धार
दिलीस मजला जिव्हा
बोलण्यास मधुर वाणी
करतो इतरांस घायाळ
माझ्या शब्दबाणांनी
हात दिलेस मजला
करण्यास मदत
करतो त्याच करांनी दंगे
घातपात
पाय दिलेस मजला
करण्या सृष्टीत संचार
मारूनी लाथ माता-पित्यास
काढतो घराबाहेर
इतरांस दिली नाही
ती बुद्धी मज दिली
गहाण ठेवूनी बुद्धी
मी झालो अहंकारी
कशास केलीे निर्माण
ही मानवजात
प्रश्न हा पडला असेल
देवा तुला स्वर्गात.

रविवार, २० जून, २०२१

पाऊस

 पावसाच्या सरी

ओल्याचिंब करी

मातीचा सुगंध 

सर्व दूर पसरवी

धरतीचा पोशिंदा

पेरणी करी

काळ्या मातीत सुखात न्हाई

रिमझिम बरसती सरी

मयूर थुई थुई नृत्य करी

हिरव्या माळावर पक्षी गाती

भिजून जाई काळी माती

भिजे अंगण भिजे ओसरी

हिरवळ पसरे सर्व दूरी




मंगळवार, १ जून, २०२१

आनंद

 

      

छोट्या छोट्या गोष्टीत आनंद

दुसऱ्याला काही देण्यात आनंद

दुसऱ्यासाठी जगण्यात आनंद

दिनदुबळ्यांची सेवा करण्यात आनंद

लहान मुलांमध्ये रमण्यात आनंद

अनाथ मुलांना काही देण्यात आनंद

भूकेलेल्याला अन्न देण्यात आनंद

दु:खीताचे अश्रू पुसण्यात आनंद

इतरांचे सुख पहाण्यातच खरा आनंद


अभिवादन विर सावरकरांना

  वी रास मुजरा जन्म भगुर गावी ज्या विनायकाचा झाला, बाल वयातच त्याने लढा स्वातंत्र्याचा आरंभला, काव्य,लेख,पुस्तके लिहून, देशाप्रती अभिमान जाग...