काव्य रसिक

मंगळवार, २४ ऑगस्ट, २०२१

नाते हे ऋणानुबंधाचे

 

नाते हे ऋणानुबंधाचे
विणू या रेशीम धाग्याने
नाते हे जन्मोजन्मीचे
बहरील प्रेम धाग्याने
मौल्यवान नाते हे
असते बहिण-भावाचे
करूनी रक्षा बहिणीची
पाठीशी सदैव उभा राही
भावासाठी अपुल्या प्रार्थना
बहिण करीत राही
काटा टोचताच तिला
येई त्याच्या डोळा पाणी
समस्या येती त्याला
साथ देई ती त्याला
भांडत असती जरी
प्रेम एकमेकांवर करती





मंगळवार, ६ जुलै, २०२१

देवास पडलेला प्रश्न

 


माणसाचा जन्म देऊनी
केले उपकार माझ्यावर
तुला वाटले देवा
करीन हा जगाचा उद्धार
दिलीस मजला जिव्हा
बोलण्यास मधुर वाणी
करतो इतरांस घायाळ
माझ्या शब्दबाणांनी
हात दिलेस मजला
करण्यास मदत
करतो त्याच करांनी दंगे
घातपात
पाय दिलेस मजला
करण्या सृष्टीत संचार
मारूनी लाथ माता-पित्यास
काढतो घराबाहेर
इतरांस दिली नाही
ती बुद्धी मज दिली
गहाण ठेवूनी बुद्धी
मी झालो अहंकारी
कशास केलीे निर्माण
ही मानवजात
प्रश्न हा पडला असेल
देवा तुला स्वर्गात.

रविवार, २० जून, २०२१

पाऊस

 पावसाच्या सरी

ओल्याचिंब करी

मातीचा सुगंध 

सर्व दूर पसरवी

धरतीचा पोशिंदा

पेरणी करी

काळ्या मातीत सुखात न्हाई

रिमझिम बरसती सरी

मयूर थुई थुई नृत्य करी

हिरव्या माळावर पक्षी गाती

भिजून जाई काळी माती

भिजे अंगण भिजे ओसरी

हिरवळ पसरे सर्व दूरी




अभिवादन विर सावरकरांना

  वी रास मुजरा जन्म भगुर गावी ज्या विनायकाचा झाला, बाल वयातच त्याने लढा स्वातंत्र्याचा आरंभला, काव्य,लेख,पुस्तके लिहून, देशाप्रती अभिमान जाग...