काव्य रसिक

मंगळवार, २५ मे, २०२१

मृत्यू

 अकस्मात होत्याचे नव्हते

करून जातो

आता होता कोठे गेला

भांबावून सोडतो

आनंदाचे दोन चार क्षण

खिळवून ठेवतो

दु:खाची लाट येताच

आनंद दूर जातो

मनाचा बांध फुटतो

अश्रूंचा पूर वहातो

मिळाले त्यात समाधान माना

शिकवून जातो

हसतखेळत जगा हा

संदेश देऊन जातो

तोच हा मृत्यू जो

मनाला चटका लावून जातो



गुरुवार, २० मे, २०२१

संस्कार

 


चिमुकली कळी जन्माला आली

हळूहळू ती उमलायला लागली

निरागस मन तिचे निरागस रूप

हसतखेळत जगत असते सदा राहून खूष

संस्काराची सवय याच वयात लावा

संस्कारच पडतील पुढे तिच्या कामा

या छोट्या कळीचे मग होते फूल

तिच्या विश्वात ती असते मश्गूल

सर्वांवरच ती टाकते विश्वास

स्वत:वरच असतो तिला अभिमान

पाश्चात्यांप्रमाणे करते पेहराव

त्यांच्याप्रमाणेच बदलते तिचे राहणीमान

लोकांच्या बोलण्याने ती फसते

चांगले काय वाईट काय याची  जाणीव नसते

लोकांच्या बोलण्याने ती जाते हुरळून

स्वतःच्या मतांचा पडतो तिला विसर

करत नाही मग ती कोणाचाच आदर

पश्चात्ताप करण्याची पाळी मग येते

आणि संस्काराची कमतरता जाणवते.

गुरुवार, १३ मे, २०२१

आईची व्यथा


पदराचा झुला करून तुले म्या झोपविल

पोटाले चिमटा काढून तुले म्या भरविल

पैसे नवते जवळ तरी तुले म्या शिकविल

तुयासाठी लोकांची उंबर म्या झिजविल

खूप कष्ट करून तुले कामधंद्याला लाविल

तू पोटापाण्याला लागल्यावर तूव लगीन लावून दिलं

तूव लगीन लावल्यावर म्या समाधान पावल

सुखाचे दिस दावले म्हून देवाचं आभार म्या मानलं

पन हाय रं देवा दोन वरसातच तुन मले वृद्धाश्रमात धाडलं


गुरुवार, ६ मे, २०२१

आई

 

          

'आई' या शब्दात दडलेले असते प्रेम

मुलांवरच करत असते दिवसरात्र प्रेम

मुलांचे चांगले करण्यात जीव असतो गुंतलेला

कितीही थकली तरी चेहेरा नसतो शिणलेला

मुले झाल्यापासून ती जगत नाही स्वत:करीता

स्वतः चा सर्व वेळ घालवते

मुलांच्या सुखाकरीता

मुलांनीही तिचे मन घेतले पाहिजे जाणून

तिला सुख देणे हे आपले कर्तव्य समजून

आईला मात्र मुलांच्या कर्तव्याची आशा नसते

ती सदैव मुलांकरिता झटत रहाते


अभिवादन विर सावरकरांना

  वी रास मुजरा जन्म भगुर गावी ज्या विनायकाचा झाला, बाल वयातच त्याने लढा स्वातंत्र्याचा आरंभला, काव्य,लेख,पुस्तके लिहून, देशाप्रती अभिमान जाग...